Asaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण
Asaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण
Asaduddin Owaisi : लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, असे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे. दरम्यान याच मुद्यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी डॉ. मोहन भागवत यांच्यावर टीका करत प्रतीप्रश्न केला आहे.
डॉ. मोहन भागवत यांच्या जिभेवर मला भरोसा नाही- असदुद्दीन ओवेसी
डॉ. मोहन भागवत यांच्या जिभेवर मला भरोसा नाही. ते एकीकडे सांगतात दुसरं आणि करतात भलतंच. मोहन भागवत म्हणतात पोर पैदा करा, मात्र ते काय देतील त्यांना? ते काही स्कीम आणणार आहेत का? TFR रेट हिंदू आणि मुसलमान यांच्यातील खूप वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी एक स्कीम आणावी माझे 6 मुल आहेत, मोदी आणि अमित शहाचे देखील जास्त मुल आहेत का? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मोहन भागवत यांनी हे नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगावं. TFR रेट ह्या देशात पडलेला आहे. तर यांचेच काही आमदार म्हणतात 2 च्या वरती मुल नकोत, एकीकडे असं ही बोललं जात आहे, काही तरी एक पकडुन चला असेही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.