Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 8 PM
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार...गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्तास्थापनेची संधी हुकली...
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार...पण काँग्रेसच्या जागा घसरल्या...भाजपला जम्मूत मोठं यश...पीडीपीचं पानिपत...
हरियाणातल्या विजयाचा भाजपकडून दिल्लीत जल्लोष...पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन
हरियाणातल्या विजयानंतर महाराष्ट्रातही भाजपचा जल्लोष...आत्मविश्वास वाढला, फडणवीसांची प्रतिक्रिया... फेक नरेटिव्हवरुन विरोधकांना टोला..
हरियाणा आणि जम्मू कश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक... पुढील रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी तातडीची बैठक बोलवल्याची माहिती
भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडते'.. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचा सल्ला...
महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात.. फडणवीसांच्या बंगल्यावर प्रभारींसह ज्येष्ठ नेत्यांची बैठक...
अजित पवार बारामती मधूनच लढणार.. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांची घोषणा, तर अजित पवारांनी बारामतीतूनच लढावे म्हणून बारामतीकर आक्रमक
मविआच्या आजच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला..११ तारखेला पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता