TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत सुमारे २ तास महायुतीची बैठक, मुख्यमंत्रिपद आणि खातेपाटपाबात शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांशी चर्चा, लवकरच निर्णय जाहीर करणार..
महाबैठकीतल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण... देवेंद्र फडणवीस, अजितदादांच्या चेहऱ्यावर हास्य तर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी..
अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्लीतील बैठकीचा फोटो समोर, फोटोत एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असल्यानं चर्चांना उधाण.
नाराज वगैरे काहीही नाही, मी खुश आहे, फोटोबाबतच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर इतर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचं, शिंदेंची भावना.
फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईत बैठक, अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होणार.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक.
उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं, शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे गळ घातल्याची माहिती, शिंदेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केल्यानंतर नेत्यांचा आग्रह.