Saat Barachya Batmya : हिंगोलीमधील वसमतमध्ये हळदीला ३५ हजार रुपये भाव : 10 ऑगस्ट 2023
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 07:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील महिनाभरापासून हळदीच्या भावामध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. माधवराव पतंगे या शेतकऱ्याने त्यांच्याकडे असलेली १० क्विंटल हळद,वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणली होती. हळदीचा दर्जा चांगल्या पद्धतीने असल्याने,या हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. मागील आठवड्यामध्ये हळदीला तीस हजार रुपये पर्यंत इतका भाव मिळाला होता. परंतु या आठवड्यात हे भाव अजून वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.