Saat Barachya Batmya : 25 वर्षाचे कष्ट दुग्ध व्यवसायातून भरभराट, गायीच्या शेणापासूनही लाखोंची कमाई
abp majha web team | 06 Jul 2023 07:55 AM (IST)

सांगोल्यातील इमडेवाडी गावातील अल्पभूधारक आणि अशिक्षित शेतकऱ्याने दुगध व्यवसायातून अल्पावधीत आपले आगळे वेगळे वैभव उभे केले आहे. प्रकाशबापू इमडे हे त्यांचं नाव आहे. १ गायीपासून सुरु केलेला व्यवसाय आज १५० गायींवर पोहोचलाय. रोज १ हजार लिटर दूध ते डेअरीला घालतात. कार्पोरेट कंपनीला लाजवेल असं त्यांचं नियोजन असतं. दूध आणि शेणाच्या पैशातून त्यांनी त्यांनी रानात टोलेजंग बंगलाही बांधलाय. घरावर गायीचा आणि दुधाच्या कॅनचा पुतळा गावात शिरताच लक्ष वेधून घेतो. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी.