Maharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?

Continues below advertisement

Maharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ? 

राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे बहुमत मिळाले. निकालानंतर आता महायुतीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्रिपद कोणाकडे द्यावे, याबाबत महायुतीतील मित्रपत्रांमध्ये चर्चा चालू आहे. तर दुसरीकडे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवलीआहे. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. दरम्यान, या निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण केले जात असताना अचंबित करणाऱ्या बाबी समोर येत आहेत. ताज्या अभ्यासानुसार तुतारी (ट्रम्पेट) या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळपास 9 जागांवर फटका बसला आहे.   आकडेवारी काय सांगते?  विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे होते. याच निवडणुकीत अनेक जागांवर तुतारी (ट्रम्पेट) असे चिन्ह असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तुतारी या नावामुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्तक केला जात होता. त्याची प्रचीती आता आली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणुकीत एकूण नऊ जागांवर फटका बसला आहे. तुतारीला मिळणारी मतं जर शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार विजयी झाले असते, असे बोलले जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram