Saat Barachya Batmya :7/12: अंत्रावली गावात सामूहिक नांगरणी स्पर्धा, 50 हून अधिक बैलजोड्यांचा सहभाग
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 06:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभर शेतात साचलेलं पाणी... मातीचं लोणी होऊन बनलेला तांबूस रंगाचा चिखल... त्यात धावणाऱ्या बैलगाड्या... हातात गमछा भिरकावणारे गाडीवान... उडणारा रेंधा... आणि दुतर्फा उत्साहानं ओरडणारे ग्रामस्थ... हे चित्र आहे, संगमेश्वर तालुक्यातील अंत्रावली इथलं... निमत्त होतं सामूहिक नांगरणी स्पर्धेचं...जिल्ह्यातल्या ५० हून अधिक बैलजोड्या यात सहभागी झाल्या. गेल्या काही वर्षांत सामूहिक शेती आणि अशा स्पर्धा कमी झाल्या... मात्र अंत्रावलीच्या ग्रामस्थांनी मात्र ही परंपरा एकोप्यानं आणि तितक्याच उत्साहाने टिकवून ठेवलीय. सामूहिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.