Saat Barachya Batmya 712 : यवतमाळमध्ये खरीपाच्या लागवडीसाठी कापूस, सोयाबीन, तुर बियाणांचा तुटवडा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृग नक्षत्र दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग पाहायला मिळतेय, मात्र यवतमाळ जिल्ह्यात खरीपाच्या लागवडीसाठी कापूस, सोयाबीन, तुर पिकांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवू लागलाय, त्यामुळे बियाण्यांचा तुटवडा दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय. जिल्ह्यात ९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता असल्याने २२ लाख ७५ हजार कापुस बियाण्यांच्या पॅकेट्सची नोंदणी करण्यात आलीय, तर १३ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे म्हणून लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षीत बियाणे मिळण्याची शक्यता कमी झालीय, त्यामुळे कृषी विभागाने वेळीच लक्ष घालून बियाण्याचा तुटवडा दुर करण्याची गरज निर्माण झालीय, अन्यथा बाजारात बोगस बियाण्यांची विक्रि होवू शकते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी--