Saat Barachya Batmya 712 :पालघरमध्ये स्ट्रॉबेरी, मोगरा, भाजीपाल्याची लागवड, शेतकऱ्यांना चांगला फायदा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या दुर्गम भागात पावसाळ्यानंतर रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं. या भागात तांदूळ आणि नाचणी ही प्रमुख पीकं असली तरी सध्या या भागातील शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करतोय. फक्त शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता सेवाभावी संस्थांच्या मदतीने जव्हार मोखाड्यातील शेतकरी गटशेतीकडे वळू लागला आहे. जव्हार मधील निहाळे ग्रामपंचायत हद्दीतील दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येत स्ट्रॉबेरी, मोगरा, भाजीपाला यांची लागवड केली आहे. यापासून त्यांना चांगला आर्थिक नफाही मिळत आहे. पालघरचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याच गटशेतीला भेट दिली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेत शासन त्यांच्या पूर्ण पाठीशी असल्याचं आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिलं.