Jogeshwari Attack: जोगेश्वरीत शिंदे गटाच्या नेत्यावर हल्ला, एकनाथ शिंदेंची ट्रॉमा रुग्णालयाला भेट
abp majha web team | 15 Oct 2025 12:10 AM (IST)
मुंबईतील जोगेश्वरी येथे शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नाझिया सोफी आणि त्यांचे पती अब्दुल जब्बार सोफी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन सोफी दाम्पत्याच्या तब्बेतीची विचारपूस केली. 'आम्ही तुमच्यासोबत आहोत. काम करत राहा; कुणाला घाबरण्याची गरज नाही,' अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांना धीर दिला. जोगेश्वरी पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ७८ मध्ये पालिकेच्या कामाची पाहणी करत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अब्दुल जब्बार सोफी गंभीर जखमी झाले असून त्यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला जात असून, मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.