मुंबई | आलोकनाथ यांची विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीची तक्रार

बॉलिवूडचे बाबुजी अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांनी प्रख्यात मालिका लेखिका विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे... आलोकनाथ यांच्यावतीनं त्यांची पत्नी आशु यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे... विनता नंदा यांनी सोमवारी फेसबूक पोस्टमधून नाव न घेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.. त्यावेळी  आलोकनाथ यांनी दारुच्या नशेत त्यांच्याच घरी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आऱोप विनता नंदा यांनी केलाय़... विनता नंदा यांच्यानंतर अभिनेत्री संध्या मृदुलनंही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले... आतातर हिमानी शिवपुरी, रेणुका शहाणेसारख्या अभिनेत्रीनेही नंदा यांनी केलेल्या आरोपांचं समर्थन केलंय... त्यामुळे विनता नंदा यांच्यानंतर बॉलिवूडचे बाबुजी आणखी कुणाकुणाविरोधात तक्रार करतात, हे पाहावं लागेल...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola