मुंबई | प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचं निधन
प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचं निधन झालंय.. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय... मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतलाय.. अन्नपूर्णा देवी या उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आणि शिष्या तर पंडीत रविशंकर यांच्या पत्नी होत्या.. प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह सरोदवादक आशिष खान, अमित भट्टाचार्या, बहादुर खान. बसंत कब्रा हे त्यांचे शिष्य आहेत... अन्नपूर्णा देवी यांना भारतातल्या पद्मभूषण या सन्मानानंही गौरवण्यात आलं होतं..