Majha Vishesh :मोफत लसीकरणाचा भार राज्य कसा पेलणार? तरुणांच्या लसीकरणाची जबाबदारी कुणाची? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2021 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यातील 18 वर्षांवरील नागरिकांना 1 मे पासून मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडून पैसे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्य सरकारने नंतर मुंबई महापालिकेचे पैसे परत करावेत, असंही त्यांनी म्हटले आहे. मात्र या मागणीशी आपण असहमत आहोत, असं मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलं आहे.