Loudspeaker Removal | नागपूरमध्ये धार्मिक स्थळांवरील 300 हून अधिक भोंगे हटवले, कारवाई सुरू
abp majha web team Updated at: 15 Jul 2025 12:26 PM (IST)
नागपूरमध्ये धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे आणि लाउडस्पीकर काढण्याची कारवाई सुरू आहे. मुंबईप्रमाणेच नागपूरमध्येही ही मोहीम राबवली जात आहे. शहरातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी तीनशेपेक्षा जास्त भोंगे आणि लाउडस्पीकर काढले आहेत. ही कारवाई आज आणि उद्या असे दोन दिवस सुरू राहणार आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी भोंगे किंवा लाउडस्पीकर काढण्यात आले आहेत, त्या ठिकाणी ते पुन्हा लावल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल. नागपूर पोलिसांनी या संदर्भात कठोर इशारा दिला आहे. या कारवाईमुळे शहरात नियमांचे पालन सुनिश्चित केले जात आहे.