Rescue Operation | वर्ध्यात यशोदा नदीला पूर, 4 मजूर वाचले
abp majha web team | 09 Jul 2025 05:22 PM (IST)
वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. यशोदा नदीपात्रालगत असलेल्या चार चानकी गावाजवळ चार बांधकाम मजूर पुरात अडकले. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलजीवन विस्कळीत झाले होते. सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चारही मजुरांचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. डीडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली होती. पुरात अडकलेल्या चारही जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले. महसूल व्यवस्थापनाची टीमही या बचावकार्यात सहभागी होती. प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी घटनास्थळावरून आढावा घेतला.