VIDEO | सुजयला भाजपमध्ये कोणी ढकललं? | माझा विशेष | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2019 07:24 PM (IST)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी "सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एकच वादा सुजय दादा! अशा घोषणांना संपूर्ण हॉल दणाणून गेला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हेलियनच्या गरवारे बँक्वेट हॉलमधील सोहळ्यात, जोरदार शक्तप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.