VIDEO | काँग्रेसने वंचित आघाडीचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे चर्चेचे प्रस्ताव संपले - प्रकाश आंबेडकर | एबीपी माझा
काँग्रेसकडून सतत संदेश येत होते की सामंजस्यपूर्ण चर्चा झाली पाहिजे. मात्र वंचित आघाडीकडून दिलेला प्रस्ताव धुडकावत काँग्रेसचे वंचित आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यास नकार दिला, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले आहेत आणि आता काँग्रेससोबत चर्चा होणं शक्य नाही असं म्हणत येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवर वंचित आघाडीकडून उमेदवार जाहीर केले जातील असंही त्यांनी जाहीर केलं आहे.