VIDEO | पाकिस्तानला धडा शिकवण्यात चूक काय? | माझा विशेष | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2019 08:33 PM (IST)
बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातायत. आम्हाला पुरावे हवेत, असं म्हणत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. आता पुन्हा हाच प्रश्न उपस्थित केला गेलाय.. तो म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, इंडियन ओव्हसीज काँग्रेसचे अध्यक्ष, गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांच्याकडून.. पुलवामासारखे हल्ले होतातच, पण त्यासाठी एअर स्ट्राईक हा चुकीचा असं वादग्रस्त विधान पित्रोदांनी केलंय. आपल्या सैन्याने आधीच स्पष्ट केलंय, की पुरावे केव्हा आणि कधी द्यायचे हे काम सरकारचं. त्यामुळे विरोधक सातत्याने पुरावे मागतायत.बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल प्रश्न विचारेल जाऊ शकतात पण म्हणून हा हल्लाच चुकीचा होता ह म्हणणं योग्य आहे का... आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात चूक काय? मुळात हल्ला नको होता वगैरे म्हणणाऱ्यांचा हा भेकडपणा कशासाठी