VIDEO | सॅम पित्रोदांच्या एअरस्ट्राईकवरील आरोपांनंतर पंतप्रधानांचा ट्वीटमधून निशाणा | एबीपी माझा

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी बालाकोट एअरस्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आता नवा वाद उफाळला आहे. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात खरंच 300 अतिरेक्यांचा खात्मा झाला का, असा सवाल सॅम पित्रोदा यांनी विचारलाय. शिवाय या हल्ल्याबाबत जाणून घेण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार आहे, असंही पित्रोदा यांनी म्हटलंय. त्यावर आक्षेप घेत पंतप्रधान  मोदींनी देशाच्या 130 कोटी जनतेनं भारतीय जवानांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या विरोधकांना याचा जाब विचारावा, आणि जवानांसोबत खंबीरपणे उभं राहावं,असं आवाहन करणारं ट्विट केलंय...मुंबई हल्ल्यावेळी आठ लोक इथं आले आणि त्यांनी काहीतरी केलं असंही अत्यंत सहजतेनं पित्रोदा बोलून गेले..मुंबईवरच्या हल्ल्यामुळं पाकिस्तानातील सर्व नागरिकांना आपण दोषी ठरवू शकत नाही असंहि पित्रोदा म्हणाले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola