Ramdas Athawale Majha Katta : भाजपमुळे शिर्डीतून उमेदवारी मिळाली नाही, आठवलेंची 'माझा कट्टा'वर खदखद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महायुतीतून (Mahayuti Seat Sharing) मला एकही जागा मिळाली नाही, शिर्डीतून (Shirdi) जागेचा आग्रह होता, मात्र तसं काही झालं नाही असं म्हणत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) मनातली खदखद मांडली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा' यामध्ये खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लोकसभेसाठी आरपीआयला उमेदवारी मिळाली नसतानाही महायुतीसोबत राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. आठवले यांनी पुढे सांगितलं की, मी शिर्डीतून उभं राहावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण महायुतीतून मला एकही जागा मिळाली नाही. र्शिडी मतदारसंघासाठी आठवलेंची मागणी होती. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शिर्डीच्या जागेबद्दल बोलणं झालं होतं. अमित शाहांना पत्र लिहिलं होतं. जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलं होतं. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की चर्चेमध्ये तुमचं नाव आलेलं नाही. फडणवीसांनी माझ्यासोबत चर्चा केली असती आणि सोलापूर किंवा ईशान्य मुंबईच्या जागेबाबत चर्चा केली असती, तर आमच्या दलितांची मते मला मिळाली असली, पण अशी चर्चा झाली नाही.