Chandrakant Patil Majha Maha Katta : रात्री फोन, पहाटे भेट; दादांनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrakant Patil Majha Maha Katta : रात्री फोन, पहाटे भेट; दादांनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा
मुंबई : भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत.चंद्रकांत पाटील यांनी दादांची पहिली भेट कधी झाली, कशी झाली हे खरंतर आठवणार नाही. अगदी अकरावीपासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत होते. तेव्हा दादा पूर्णवेळ काम करत असावेत. मला आठवत नाहीये. पण चंद्रकांतदादा (Chandrakant Patil ) कदाचित राज्यपातळीवर काम करत असावेत. आम्ही लग्नासाठी खूपच वर्षांनी म्हणजे 2004 साली भेटलो. आमचा एक कॉमन मित्र आहे. त्याने माझ्याकडे चंद्रकांतदादांसाठी विचारण केली. त्यानंतरही मी विचार करायला खूप वेळ घेतला. मी होकार देण्यासाठी दोन-अडीच महिने घेतले असतील. माझं त्या वेळेला ऑडिटचं काम चालू होतं. सप्टेंबरपर्यंत आमचं खूप काम चालतं. अगोदर ऑडिट आणि मग चंद्रकांतदादांचा विचार केला, अशी आठवण अंजली पाटील यांनी सांगितली.