Majha Maha Katta Chandrakant Patil :साधा माणूस मंत्री कसा बनला,भाजपचे सुपरमॅन चंद्रकांतदादांची कहाणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Maha Katta Chandrakant Patil :साधा माणूस मंत्री कसा बनला,भाजपचे सुपरमॅन चंद्रकांतदादांची कहाणी
मुंबई : भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. याच चंद्रकांत पाटील यांच्या लग्नाची गोष्ट खास आहे. चंद्रकांत पाटील आणि त्यांची पत्नी अंजली पाटील यांच्या एका कॉमन मित्राने हे लग्न जुळवून आणले होते. याच लग्नाचा किस्सा चंद्रकांत पाटील आणि अंजली पाटील (Anjali Patil) यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या कार्यक्रमात सांगितला.
आमचा एक कॉमन मित्र आहे त्याने
चंद्रकांत पाटील यांनी दादांची पहिली भेट कधी झाली, कशी झाली हे खरंतर आठवणार नाही. अगदी अकरावीपासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत होते. तेव्हा दादा पूर्णवेळ काम करत असावेत. मला आठवत नाहीये. पण चंद्रकांतदादा (Chandrakant Patil ) कदाचित राज्यपातळीवर काम करत असावेत. आम्ही लग्नासाठी खूपच वर्षांनी म्हणजे 2004 साली भेटलो. आमचा एक कॉमन मित्र आहे. त्याने माझ्याकडे चंद्रकांतदादांसाठी विचारण केली. त्यानंतरही मी विचार करायला खूप वेळ घेतला. मी होकार देण्यासाठी दोन-अडीच महिने घेतले असतील. माझं त्या वेळेला ऑडिटचं काम चालू होतं. सप्टेंबरपर्यंत आमचं खूप काम चालतं. अगोदर ऑडिट आणि मग चंद्रकांतदादांचा विचार केला, अशी आठवण अंजली पाटील यांनी सांगितली.
तशीच जबाबदारी तुझी असेल का?
मी वयाच्या 36 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी लग्न केलं पाहिजे, असा आग्रह माझे मित्र करायचे. आमचा अभय बापट नावाचा एक कॉमन मित्र आहे. तो पार्ले येथे राहतो. अंजली आणि तिचा भाऊ असे ही दोघेच भावंडं होती. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी अजली यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अशा वेळा बापटने हा प्रस्ताव आणला होता. माझ्या आई-वडिलांची जबाबदारी ही माझी आहे. तशीच जबाबदारी तुझी असेल का? असे मला अंजलीने विचारले. मी पहिल्याच भेटीत हो म्हटलं. थोडा विश्वास यायला तिला वेळ लागला. त्यामुळे अंजली कधी उत्तर देणार? या प्रश्नापोटी मी अस्वस्थ नव्हतो, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
सविस्तर बातमी :