Majha Katta With Gauri Sawant: कसं असतं तृतीयपंथीयांचं आयुष्य? श्रीगौरी सावंत माझा कट्ट्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Katta With Gauri Sawant: कसं असतं तृतीयपंथीयांचं आयुष्य? श्रीगौरी सावंत माझा कट्ट्यावर
आम्ही विशिष्ट पद्धतीने टाळी वाजवतो, तो आमचा आक्रोश असतो, परिस्थितीविरुद्धची चीड असते, समाजाला बलात्कारी गुन्हेगार चालतो मग आम्ही का नाही चालत असा प्रश्न श्रीगौरी शिंदे यांनी विचारला आहे. समाजाला विष्णूचे मोहिनी रूप चालतं, हरिहरन म्हटलेलं चालतं, पण आम्हाला स्वीकारायचं नाही हे दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या. श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला.
प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. अनेक तृतीयपंथीय हे आज भीक मागतात, पण मला कधीही असं वाटलं नाही, मला सन्मानानं जगायचं होतं आणि मी ते केलं असं त्या म्हणाल्या.