Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP Majha

Continues below advertisement

धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना ७३ कोटी ३६ लाखांची बोगस बिलं उचलली गेली...भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप...१४ कोटींची बिलं आकानं उचलल्याचा दावा...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांनी दिला नैतिकतेचा दाखला...तर दोषी वाटत असेन तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा मागावा, धनंजय मुंडे यांचं राजीनाम्यावर उत्तर...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांकडे टोलावला...मुंडेंबाबतची कागदपत्रं मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत केलं स्पष्ट..

संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, पण आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच...आरोपी कसा सापडत नाही, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल...

ठाण्यात जनता दरबार घेण्य़ाच्या गणेश नाईकांच्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा...मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती...कोणताही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो, बावनकुळेंकडून नाईकांचं समर्थन...

दहावी, बारावीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको..कॉपीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणेंचं शिक्षणमंत्री दादा भुसेंना पत्र

मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार..सरकारी नोक-या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram