Majha Katta With Shree Thanedar : अमेरीकेतील मराठमोळे गव्हर्नर माझा कट्ट्यावर - श्री ठाणेदार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही माणसं जिवंतपणीच एक यशोगाथा बनतात आणि श्री ठाणेदार हे त्यातलंच एक नाव... १९५५ साली बेळगावमध्ये जन्माला आलेल्या श्री ठाणेदार यांनी प्रचंड गरीबीतून मार्ग काढत बीएसएसी पर्यंत शिक्षण पुर्ण केले, मिळेल ते काम करत कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.... त्यानंतर मुंबईत आले पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले काही काळ भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी केली आणि अमेरिकेतील अक्रॉन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळवला... वयाच्या चोविसाव्या वर्षी अमेरिकेत पाऊल ठेवलेल्या या व्यक्तीने आपलं शिक्षण पुर्ण केलं आणि एका कंपनीत नोकरी पत्करली... अत्यंत कष्टाने एक कंपनी खरेदी केली आणि इतकी मेहनत केली की अमेरिकेतील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून नाव कमावलं... ही श्री ची इच्छा हे आत्मचरित्रही लिहिलं.... २००८ हे मंदीचं साल उजाडलं आणि परक्या भुमीत आपलं म्हणून कमावलेलं सगळं घेऊन गेलं. पण श्री ठाणेदार यांनी हिंमत हरली नाही... जे गेलं ते सगळे दुपटीने कमावल