ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा, पहिल्याच प्रचारसभेत अमित शाह यांचं सूचक वक्तव्य...मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिल्याची चर्चा...

आमचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून ३२ शिराळ्यात नागपंचमी पुन्हा सुरु करणार, सांगलीतल्या सभेत अमित शाहांची ग्वाही

एक है तो सेफ है, महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा नारा... तर 
बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र सहन करणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती...


महायुती म्हणजेच महाराष्ट्राची गती, धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदींची घोषणा, तर मविआमध्ये ड्रायव्हरच्या सीटसाठी चढाओढ, विरोधकांना टोला

काँग्रेस नेत्यांनी रोज १५ मिनिटं सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी, नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचं काँग्रेस नेत्यांना आव्हान तर बाळासाहेबांचंही कौतुक करण्याचं चॅलेंज

प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले असले तरी त्याच्यामागं अनेकांची डोकी होती, पूनम महाजनांचा माझा कट्टामध्ये गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून सत्य समोर आणण्याची मागणी करणार...

टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील म्हणून मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांपासून रखडला, गुहागरच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल 


महायुतीत सामील होण्यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चिट, ईडीच्या भीतीमुळे महायुतीत गेल्याच्या आरोपांवर भुजबळांचं स्पष्टीकरण, कुणालाही कसलीही मुलाखत दिली नसल्याचा दावा

पुस्तकात दावा केल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीच बोलले नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण...निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा

भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ईडीच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंचा दावा, अदृश्य शक्ती फक्त पुरुषांना नाही तर महिलांनाही छळते, बहिणींच्या चौकशीवर बोट ठेवत आरोप


नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्हा, १० जण कंधार पोलिसांच्या ताब्यात 


अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, अल्पसंख्याक असल्याचा विद्यापीठ दावा करु शकत नाही हा १९६७ चा आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द

जम्मू काश्मीर विधानसभेत आजही अभूतपूर्व गोंधळ, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची धक्काबुक्की

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram