Majha Katta With Bharat Gogawale : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले ‘माझा कट्ट्या’वर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Katta With Bharat Gogawale : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले ‘माझा कट्ट्या’वर राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे सूचक वक्तव्य केले. भरत गोगावले यांनी काहीशा दुरावलेल्या मंत्रिपदाच्या मुद्यावर भाष्य करताना स्वत: मुळेच ही अडचण झाली असल्याचे मान्य केले. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन होत असताना 9 मंत्रीपदे होती आणि त्यासाठी 11 जण दावेदार होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सांगण्यावरून आपण थांबलो त्यानंतर वेटिंगवर असल्याचे गोगावले यांनी सांगितले. भरत गोगावले म्हणतात राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पुन्हा का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) भरत गोगावले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले