Jalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद
महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून रामाची महती, राम नामाचा अर्थ आणि रामायणाची शिकवण पोहाचवणाऱ्याचं काम ह.भ.प जलाल महाराज हे गेली अनेक वर्ष करतायत. राम नामाची महती ही सगळ्यांनाच ऐकायला आवडते. पण जेव्हा सय्यद महाराज ती महती सांगतात तेव्हा ती सगळ्यांनांच ऐकायला आवडते. यावर 'माझा कट्टा'वर (Majha Katta) बोलताना सय्यद महाराजांनी म्हटलं की, रामायण आणि श्रीराम कोणत्या जातीविषयाचे नाही, हे मानणारे आम्ही आहोत. माझे वडिल एकतारा भजन करायचे, माझे आजोबा महोम्मद बाबा वारकरी भजन करायचे, माझे नातेवाईकही भजन करायचे.
असं म्हटलं जातं की, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवलं जात नाही. त्यामुळे मी किर्तनकार होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक गोष्टींचा अभ्यास केला. अनेक प्रकारच्या रामायणाचा मी अभ्यास केला. राम मंदिराच्या सोहळ्याचा देखील मला खूप आनंद झाला, असंही जलाल महाराजांनी म्हटलं. मी निफाड तालुक्यातलं माझं गाव आहे. पण माझ्या गावात जितका आमचा समाज आहे, तो सगळा वारकरी संप्रदायाशी संलग्न आहे. आम्ही एकमेकांना भेटून रामकृष्ण हरि असंच अभिवादन करतो. आजही मुस्लिम किर्तनकार अनेक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा संत मोठा करण्यामागे ज्ञानेश्वर माऊलींचा खूप मोठा हात आहे. वारकरी संप्रदायाचा विचार हा व्यापक आहे, असं म्हणत जलाल महाराज सय्यद यांनी त्यांच्या भावना माझा कट्ट्यावर व्यक्त केला.