
ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्स
कॉमेडियन कुणाल कामराला ३१मार्च रोजी सकाळी अकरा वाजता खार पोलिस स्टेशनला हजर राहण्याचं पोलिसाचं समन्स, कामराने वकिलामार्फत मागितलेली दोन एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली
इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली.. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत उलगडा.. मोबाईलमधील डेटाही डिलीट केल्याचं मान्य
संतोष देशमुख हत्येची आरोपी सुदर्शन घुलेची कबुली, खंडणी वसुलीत अडथळा आणल्यानं केला खून, देशमुखांनी प्रतिक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्यानं राग आल्याचं दिलं कारण..
सुदर्शन घुलेच्या कबुलीने कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट.. मराठा आंदोलक मनोज जरांगेचा दावा.. धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात सहआरोपी करण्याची मागणी
छत्रपती शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा होता की नाही, आता हा वाद करणं गैरलागू.. होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकरांची भूमिका.. तुकोजीरावांनी वाघ्यासाठी नाही तर शिवसमाधीसाठी निधी दिल्याचाही दावा
ऐतिहासिक पुरावे नसले तरीही लोकांचं भावनिक नातं आहे, जास्तीचं खोदकाम करु नये.. वाघ्याच्या समाधीवर खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण, संभाजीराजे आणि भिड्यांना एकत्र बसून निर्णय घेण्याचाही सल्ला