VIDEO | सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत गप्पांची मैफिल | माझा कट्टा | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2019 11:03 PM (IST)
'नाळ' या चित्रपटाची कथा काही प्रमाणात माझ्या आयुष्याशी मिळती-जुळती आहे. कारण 'नाळ'मधल्या 'चैत्या'प्रमाणे (चैतन्य - चित्रपटातलं मुख्य पात्र)मलादेखील दत्तक दिलं होतं. अशी माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एबीपी माझाला दिली. 'कोण होणार मराठी करोडपती' आणि 'झुंड' या नागराजने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने नागराज 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी नागराजने त्याच्या आयुष्याचे काही पैलू उलगडले.