Majha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : 02 जानेवारी 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिपद न मिळाल्यान नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज नाशिकला परतणार, गेल्या काही दिवसांपासून भूजबळ परदेश दौऱ्यावर होते.
शिंदेंचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणार, ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य.
इंदापूरच्या अंथूर्णे गावात दत्तात्रय भरणेंवर जेसीबीतून फुलांची उधळण, परदेश दौरा आटोपून इंदापूरात दाखल झाल्यानंतर भरणेंच जंगी स्वागत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या दोन दिवसांत भूमिका मांडणार, दोन दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती.
राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते, ठाकरे गटातील उरलेले नेते अस्वस्थ आहेत, राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर स्वागत करू, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य.
२५ तारखेची लढाई अंतिम, मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार पंचवीस तारखेआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य
गडचिरोलीत फडणवीसांच्या उपस्थितीत ११ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, यामध्ये ३ पुरूष आणि ८ महिलांचा समावेश, आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवर सुमारे १ कोटींहून अधिकचं बक्षिस.
गडचिरोलीत आता फक्त ४६ सशस्त्र नक्षलवादी शिल्लक, पोलीस अधीक्षकांची एबीपी माझाला माहिती, येत्या दोन वर्षात गडचिरोली पूर्णपणे नक्षलवादी मुक्त करू, पोलिस अधीक्षक निलोप्पल यांचं वक्तव्य.
माओवाद्यांचा प्रभाव नाहीसा केला आता माओवाद्यांवर अंतिम प्रहार करण्याची वेळ जवळ आलीय, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, लवकरच महाराष्ट्र माओवादी मुक्त करू, फडणवीसांचं आश्वासन.