Ekvira Temple HoneyBee Attack : एकविरा गडावर भाविकांची हुल्लडबाजी, मधमाशांचा हल्ला अन् गोंधळ

Continues below advertisement

लोणावळ्यातील एकविरा गडावर मधमाशांनी हल्ला केलाय...काही हुल्लडबाजांनी फटाके फोडल्याने मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला...यावेळी भाविकांची पळापळ झाली...तर काहींना मधमाशांनी चावा घेतलाय...गडावर बंदी असतानाही भाविकांनी फटाके फोडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय...

लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे चे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाश्यांनी भविकांनवर हल्लाबोल करत चावा घेतला, यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले..मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या  काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी स्थानिकांनी केलीये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram