Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 01 जानेवारी 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या सप्तशृंगीगडावर भाविकांची गर्दी. नव्या वर्षाचा संकल्प करत भाविकांचं देवीला साकडं.
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरु, अभिषेक केल्यानंतर ७ जानेवारीच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानी मंचकी निद्रा असणार, छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 ते 14 जानेवारी दरम्यान
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रामकुंडावर सहस्त्रदिप प्रज्वलन सोहळा, गुरुवंदना, धार्मिक गायन आणि कीर्तनानं रामकुंड, गोदाघाटाचा परिसर दुमदुमला.
गोंदियातील चांदसूरज गावात नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्याची किरणं, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत डोंगराच्या मधोमध चांदसूरज हे गाव
पुणेकरांकडून नववर्षाचं जल्लोषात स्वागत, पुणेकरांकडून फटाक्यांची जोरदार आतषबाजी.
पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील आज स्वीकारणार पदभार, पदभार स्वीकारल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचा रोड मॅप देखील सादर करणार.
मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात जाळपोळीची घटना, गुलाबराव पाटलांच्या पत्नीला घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन गट आमने सामने आल्याची सूत्रांची माहिती
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा.