TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP Majha

राज्यसह देशभरात नववर्षाचं जल्लोष, राज्याचं प्रवेशद्वार असलेल्या गोंदियातील चांदसूरजमध्ये सूर्यदर्शनाने नवीन वर्षाचं स्वागत

नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याचा ट्रेंड यंदाही कायम, शिर्डी, शेगाव, तुळजापूरसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, बहुतांश मंदिरं २४ तास खुली

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नववर्षाचं दिमाखात स्वागत...ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी...दुबईतही बुर्ज खलिफाला आकर्षक रोषणाई

पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्यदिनाची जय्यत तयारी, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

शरण आलेल्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी, रात्री उशिरा झालेल्या सुनावणीनंतर केज कोर्टाचा निर्णय

गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा, बीड प्रकरणी दोषींना सोडणार नाही, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आश्वासन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram