Sacred Games 2 मधील कुसुमदेवी यादच्या भूमिकेने अमृता सुभाष किती बदलवलं? | ABP Majha

आज आपल्यासोबत अशी अभिनेत्री आहे जीची शब्द, सूर, अभिनय, नृत्य अशा सगळ्यावर तगडी पकड आहे. जी ज्येष्ठ गीतकार गुलजारांसोबत शब्दांच्या अद्भुत विश्वात रमू शकते. अभिनयाच्या कोणत्याही माध्यमात दिलखुलास वावरू शकते. रंगमंचावर गाणं फुलवू शकते आणि आपल्या लिखाणानं वाचकांनाही खिळवून ठेवू शकते. आपल्यासोबत आज आहे अमृता सुभाष
हसतमुख अमृता आता आपल्यासमोर नव्यानं आलीये सेक्रेड गेम्स २ मध्ये, रॉ एजंट कुसुमदेवी यादवच्या भूमिकेत. तीचा त्यातला धीरगंभीर, रांगडा लूक सगळ्याच तीच्या फॅन्ससाठी सरप्राईज होता. अगदी ऑस्करवारी केलेला 'श्वास' ते हिंदीतल्या 'गली बॉय'मधला तीचा अभिनय. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधल्या अभिनय प्रशिक्षणाचं वेगळेपण तीच्या प्रत्येक भूमिकेत दिसतं. तर आज सेक्रेड गेम्समधल्या तीच्या एन्ट्रीविषयी आणि एकंदरीतच तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी तीच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola