Saptha Kund Waterfall | अजिंठ्याच्या सप्तकुंड धबधब्यातून पर्यटकाचा बचाव, थरार कॅमेऱ्यात कैद | ABP Majha
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीजवळील सप्तकुंड धबधब्यात पडलेल्या पर्यटकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय..भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी दोरीच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढलं..भाऊसाहेब हुलकांडे असं या पर्यटकाचं नाव असून तो मुंबईतला रहिवासी आहे..दोन दगडांच्या कपारीत तो अडकला होता..अजिंठा, सोयगाव परिसरात मुसळधार पाऊस झालाय.. .या पावसात सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहतोय..