Kargil Vijay Diwas | कारगिल युद्धावर एअर चिफ मार्शल निवृत्त अनिल टिपणीस यांना काय वाटतं? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2019 01:42 PM (IST)
भारतीय सैन्याने २६ जुलै १९९९ साली मिळवलेल्या विजयाचा आजचा दिवस, अर्थात
कारगिल विजय दिन. भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होतं.
कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या हद्दीतील काबीज केलेली ठाणी कारगील आणि द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळालं.
देशानं टीव्हीवरून पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरलं. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचं पहिलेच युद्ध होतं. त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष या युद्धाकडे होतं. पण अखेरीस विजयाची सकाळ ज्यांच्यामुळे बघता आली त्यामध्ये महत्वाचं योगदान होतं एअर चिफ मार्शल निवृत्त अनिल टिपणीस यांचं. कारगील युद्धावेळी ते आपल्या वायू दलाचे प्रमुख होते. कारगील युद्धाचं आव्हानं, थरार प्रत्यक्ष अनुभवणारे, आणि आपल्या सगळ्यांसाठी विजयी इतिहास रचणारे एअर चिफ मार्शल निवृत्त अनिल टिपणीस सर आपल्यासोबत आहेत.