ब्रेकफास्ट न्यूज | Asian Games 2018 : रोईंगमध्ये भारताला सुवर्ण पदक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2018 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सांघिक रोईंग प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे भारताच्या या संघात महाराष्ट्राच्या दत्तू भोकनाळचा समावेश होता. भारतीय संघाने 6 तास 17 मिनिटं 13 सेकंद इतका वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं आणि सुवर्णपदक आपल्या नावे केलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. दत्तूसह भारताच्या संघात स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह हे नौकानयनपटू होते.