Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका

Continues below advertisement

Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका

 माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर (Uttam Jankar) आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात लढत झाली. या लढतीत उत्तम जानकर यांनी बाजी मारली. मात्र, आता उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केलाय. मतदानानंतर मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपला 64 हजार मते मिळाली होती. या वेळेला 54,000 मते मिळाली. मात्र मशीनमधील व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपकडे वळत असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते मशीनमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram