Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Dec 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचं बीडमध्ये आंदोलन, जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तसेच वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दमानियांचा पवित्रा.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस, आरोपींच्या हत्येबाबाबत आलेल्या मेसेजचे पुरावे देण्याच्या सूचना. तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांनी केला होता दावा
बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसंच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
फरार आरोपींमध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे का?, कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीसांना सवाल
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन, देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे यासाठी मराठा समाजाचं गांजवे चौकात आंदोलन