TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 August 2024 : 07 PM : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणी मविआचं उद्या मुंबईत जोडे मारो आंदोलन, मुंबई पोलिसांची मात्र अद्याप आंदोलनाला परवानगी नाही.
उद्या महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन, आंदोलनाआधी ठाकरे गटाकडून टीझर ट्वीट.
लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात जातायत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, फडणवीसांचं बहीणींना आश्वासन.
लाडकी बहीण योजनेद्वारे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळणार, महायुतीचं सरकार आलं तर पुढचे पाच वर्ष ही योजना सुरुच राहील असा शब्द देतो, अजित पवारांचं वक्तव्य.
लाडकी बहीण कार्यक्रमानंतर शिंदे, फडणवीस हेडगेवारांच्या स्मृतीभवनावर, अजित पवारांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं.
राष्ट्रवादी महायुतीत६० हून अधिक जागा घेण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीचे ५४ आमदार, काँग्रेसचे तीन आणि अपक्ष तीन आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य,.