बारामती : दुधाला 25 रुपयांचा दर नाहीच, सरकारची घोषणा फसवी?
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2018 04:29 PM (IST)
शेतकऱ्यांच्या दुधासाठी राजू शेट्टींनी पुकारलेलं दुध आंदोलन पाण्यात गेलं का असा प्रश्न पडलाय. कारण अद्यापही शेतकऱ्यांच्या दुधाला 25 रुपयांचा भाव मिळत नाही.
सरकारनं घोषणा केली पण त्यांची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही.
21 जुलैला सरकारनं दुधदरासाठी 25 रुपये प्रतिलीटर दर देण्याची घोषणा केली. त्यानंतर आजपासून त्याची अंमलजबावणी होणं अपेक्षित होतं मात्र बारामतीमधील शेतकऱ्यांना अद्यापही दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.