अमरावती शहरात शेवंती पुष्प प्रदर्शनाचे आयोजन | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2018 02:09 PM (IST)
अमरावती शहरातील कँप परिसरात शेवंती पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर शेवंती फुलाचे एकूण 16 प्रकार आहेत. त्यापैकी 9 प्रकार या अमरावतीच्या प्रदर्शनात नागरिकांना पाहायला मिळाले. स्पायडर, स्पून, डेकोरेटिव्ह, कोरियन असे विविध प्राकरचे शेवंतीची फुले या प्रदर्शनात होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी आपल्या घरीही शेवंती फुलाची लागवड करावी असं आवाहन यावेळी आयोजकांनी केली. एम.एस. शहा स्मृती प्रतिष्ठान आणि अमरावती गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने या शेवंती पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं.