शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूरला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जातोय. पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.