भाजप-राष्ट्रवादीचं विधीनिषेधशून्य राजकारण? | माझा विशेष | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 28 Dec 2018 11:21 PM (IST)
अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला आहे. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18, भाजपच्या 14, बसपाच्या 4 आणि एक अपक्ष अशा 37 नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमही यावेळी सभागृहात उपस्थिती होता. छिंदम नेमकं कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.