712 | मान्सून अपडेट
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2018 09:07 AM (IST)
मान्सूनचा परतीचा प्रवास गेल्या काही दिवसांपासून सुरु झालाये. सध्या नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सिमा गुजरात आणि मध्य प्रदेशात दिसून येतेय. येत्या २४ तासात कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. विदर्भात मात्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.