712 | मान्सून अपडेट
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2018 08:40 AM (IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून होणारा जोरदार पाऊस आता ओसरलाय. राज्यात काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या सॅटेलाईट इमेजवरुन आपल्याला सध्याची पावसाची स्थिती बघता येईल. राज्यावरील ढगांचं प्रमाण आता विरळ झालेलं दिसतंय. तरीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.