पुणे | उदयनराजे पवारांच्या भेटीला, उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यात
'फसवाफसवी करु नका...' असा सल्ला देणारे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले. यावेळी पवारांनी उदयनराजेंना 'वेट अँड वॉच'चा सल्ला दिला.
उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये म्हणून बारामतीमध्ये सोमवारी सकाळी उदयनराजेंच्या विरोधकांनी शरद पवारांना साकडं घातलं होतं. त्यामुळे संध्याकाळी उदयनराजेंनी तातडीने पवारांकडे भेटीची वेळ मागितली. त्यानंतर पुण्यात पवारांनी उदयनराजेंची भेट घेतली.