712 | राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार यांची निवड
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2018 08:44 AM (IST)
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात बारामतीच्या राजेंद्र पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.. तर उपाध्यक्षपदी सोलापूरच्या शिवाजी पवार यांची निवड झालीये. ही निवड २०१८ ते २०२१ या तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.. राजेंद्र पवार हे गेली तीन वर्षे या संघावर उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते.बारामती एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे ते चेअरमनसुद्धा आहेत. महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाला साठ वर्षांची परंपरा आहे. या संघात राज्यातील २७ हजार द्राक्ष उत्पादक शेतकरी सभासद आहेत.