712 | मान्सून अपडेट
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2018 08:34 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. नंदूरबारमध्ये जोरदार पावसामध्ये ६ जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. खरिपातील बहुतांश पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. तेव्हा जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं असल्यास, अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञ देतायत.